Ad will apear here
Next
बुकगंगा पब्लिकेशन्स, पुणे प्रकाशित आणि डॉ. माधवी वैद्य लिखित ‘कवी शब्दांचे ईश्वर.. असे साकारले कवी’ या पुस्तकाचे प्रकाशन

मुखवटे नसणार्‍या चेहर्‍यांपर्यंत पोहोचणे अवघड : कवी-गीतकार वैभव जोशी यांचे प्रतिपादन

डॉ. माधवी वैद्य लिखित कवी शब्दांचे ईश्वर.. असे साकारले कवीया पुस्तकाचे प्रकाशन

कवी शब्दांचे ईश्वर.. असे साकारले कवीहे पुस्तक अभ्यासकांसाठी ऐतिहासिक दस्तावेज : डॉ. पी. डी. पाटील


पुणे: कवी शब्दांचे ईश्वर.. असे साकारले कवीया पुस्तकातील कवी माझी दैवते आहेत, या कवींपर्यंत पोहोचणे म्हणजे आयुष्यभराचा चकवा लावून घेण्यासारखे आहे. या प्रत्येक कवीमधील माणसापर्यंतत्यांच्यातील दैवी प्रतिभेपर्यंत पोहोचणे अवघड आहे. तुम्ही आयुष्यात एका कवीच्या व्यक्तिमत्त्वाला दोनदा भेटू शकत नाही, असे प्रतिपादन कवी-गीतकार वैभव जोशी यांनी केले. खूप मुखवटे असणार्‍या चेहर्‍यांपर्यंत पोहोचणे सोपे आहे, परंतु मुळात ज्यांच्याकडे मुखवटेच नाहीज्यांना चेहरेच चेहरे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे, असेही त्यांनी नमूद केले.


मराठी भाषेचे वैभव आपल्या काव्यनिर्मितीतून दाखविणार्‍या कवींना बोलते करताना, त्यातून मालिका साकारताना आलेल्या रोमांचक अनुभवांवर आधारित कवी शब्दांचे ईश्वर.. असे साकारले कवीया अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य लिखित पुस्तकाचे प्रकाशन बुधवार (दि. २३ मार्च २०२२वैभव जोशी यांच्या हस्ते ज्योत्स्ना भोळे सभागृहात झाले. त्या वेळी ते बोलत होते.


डॉ. माधवी वैद्य लिखित ‘कवी शब्दांचे ईश्वर.. असे साकारले कवी’ प्रिंट पुस्तकाचे प्रकाशन व ई-बुक अनावरण प्रसंगी उपस्थित (डावीकडून) डॉ. माधवी वैद्य, वीणा संत, वैभव जोशी, डॉ. पी. डी. पाटील, सुप्रिया लिमये, राहुल घोरपडे


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील होते, त्यांच्या हस्ते कवी शब्दांचे ईश्वरमालिकेतील कवयित्री इंदिरा संत यांच्यावरील भागाचे प्रसारण करून आर्या कम्युनिकेशन्स, पुणे या यूट्यूब चॅनलचा शुभारंभ करण्यात आला. लेखिका वीणा संत प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या, त्यांच्या हस्ते कवी शब्दांचे ईश्वरयाचे ई-बुक अनावरण करण्यात आले. डॉ. माधवी वैद्य यांच्यासह बुकगंगा पब्लिकेशन्सच्या संचालिका सुप्रिया लिमये, संगीतकार राहुल घोरपडे व्यासपीठावर होते.


वैभव जोशी म्हणालेपुस्तक वाचताना अनेक कवींच्या प्रदेशात फिरून आल्याचे जाणवले. एका कवीपर्यंत पोहोचतानाही आपल्यासारख्याला अवघड जाते, तेव्हा माधवी वैद्य यांनी १३ कवींपर्यंत पोहोचून त्यांचे शब्दवैभव आणि रूप आपल्यापर्यंत पोहोचविले, तेही कुठचा शॉर्टकट न घेताखडतर प्रवास करून, हे खूप मोठे कार्य आहे.


अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. पी.डी. पाटील म्हणाले, सुमारे २५ वर्षांपूर्वी झालेल्या मालिकेच्या अनुभवांचे पुस्तक झाले हे अभिनंदनीय आहे. हे पुस्तक अभ्यासकांसाठी उपयुक्त असून ते वाचल्यानंतर अभ्यासकांना नवीन कार्यासाठी बळ मिळेल. पुस्तकाद्वारे डॉ. वैद्य यांनी पटकथेमागील कथा उलगडून दाखविली आहे. मालिका आणि पुस्तकाच्या माध्यमातून कवी पलिकडील कवी शोधण्याचा प्रयास केला आहे. प्रत्येक कवीला भेटणे, त्याला बोलते करणे हे मनस्वी काम आहे, ते डॉ. माधवी वैद्य यांनी उत्तम प्रकारे साकारले आहे. हे मोठे कार्य पूर्ण झाले असले तरी थांबू नका, अजून काम करीत राहा, अशा शुभेच्छा देऊन एक ऐतिहासिक दस्तावेज निर्माण केल्याबद्दल डॉ. वैद्य यांचे अभिनंदन केले.


वीणा संत म्हणाल्याकवी, त्यांचे घर, त्यांचा स्वभाव या विषयी जाणून घेण्याची सर्वसामान्यांच्या मनात इच्छा असते, या मालिकेद्वारे ती सफल झाली. कवीच्या व्यक्तिगत भावजीवनातील गोष्टी कवीला घडवत असतात, त्याच्या जाणिवांना प्रगल्भ करीत असतात. कवी शब्दांचे ईश्वरमालिकेद्वारे कवीचे आरशातील स्वच्छ प्रतिबिंब दाखविले गेले आहे. या पुस्तकाद्वारे अभ्यास आणि मनोरंजन अशा दोन्ही गोष्टी साधल्या गेल्या आहेत.


राहुल घोरपडे म्हणालेयातील एक-एक कवी हा अनेक वर्षांच्या अभ्यासाचा विषय आहे. रंजक तरीही अभ्यासपूर्ण असा हा पुस्तकरूपी दस्तावेज आहे. मराठीतील दिग्गज कवींच्या रूपातील हा अनमोल ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


प्रास्ताविकात डॉ. माधवी वैद्य म्हणाल्यातन-मन-धन वेचून केलेल्या कामाचा हा लोकार्पण सोहळा आहे. कवितेने मला उत्तम माणसांशी जोडले. हे पुस्तक अभ्यासकांच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे. मालिका ते पुस्तक हा प्रवास त्यांनी उलगडून दाखविला.


सुप्रिया लिमये यांनी मनोगत व्यक्त केले. राहुल घोरपडे, सुप्रिया लिमयेडॉ. माधवी वैद्य यांनी मान्यवरांचे स्वागत केले. धनेश जोशी यांनी ना. धों. महानोर यांच्या संदेशाचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता शेणई यांनी केले.


हे पुस्तक बुकगंगा डॉटकॉम वरून घरपोच मागवण्यासाठी तसेच त्याचे ई-बुक विकत घेण्यासाठी खाली तपशील दिले आहेत किंवा 8888 300 300 या क्रमांकावर व्हॉट्सअॅपकरा.


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZNQDI
Tags: From The BookBOIAse Sakarale KaviPuneLiteratureVaidyaKavitaBookganga PublicationsRahul GhorpadeNew LiteratureCultureMadhavi VaidyaKavi Shabdanche IshwarBook PagePublishingGresBookKaviAarti PrabhuP. S. RegeBookgangaSahityaVartaBOIDr. Madhavi Vaidyaडॉ. माधवी वैद्यसुप्रिया लिमयेकवीसाहित्यवार्ताVeena Santपुस्तकाचं पानMangesh Padgaonkarपुणेसाहित्यग. दि. माडगुळकरविंदा करंदीकरPoetryसाहित्य-संस्कृतीVasant Bapatबुकगंगा पब्लिकेशन्सआरती प्रभुग्रेसवसंत बापटGraceकाव्यDr. P. D. PatilKusumagrajIndira Santसुरेश भटN. D. MahanorBook Publishingइंदिरा संतवैभव जोशीअसे साकारले कवीमाधवी वैद्यकवी शब्दांचे ईश्वरशांता शेळकेवैद्यकवितापुस्तक प्रकाशनप्रकाशनG. D. Madgulkarना. धों. महानोरपु. शि. रेगेपुस्तक परिचयSuresh Bhatपुस्तकनारायण सुर्वेVaibhav JoshiNarayan Surveडॉ. पी. डी. पाटीलमंगेश पाडगांवकरShanta Shelkeपी. एस. रेगेबुकगंगाकुसुमाग्रजVinda Karandikarराहुल घोरपडेवीणा संतSupriya Limaye
Similar Posts
हवा असा थाटमाट असे गूज लिहायाला... चार जानेवारी हा कवयित्री इंदिरा संत यांचा जन्मदिन. प्रसिद्ध कवयित्री, कर्तृत्ववान स्त्री, गृहिणी, आदी भूमिकांतील इंदिरा संत यांचे साधे आणि सखोल व्यक्तिमत्त्व त्यांच्या धाकट्या सूनबाई वीणा संत यांनी ‘आक्का, मी आणि... ’ या पुस्तकामधून उलगडून दाखविले आहे. सासूबाई म्हणून, आजी म्हणून, घरातली मोठी व्यक्ती
बुकगंगा पब्लिकेशन्स पुणे प्रकाशित आणि पद्माकर पाठकजी लिखित ‘सुनहरे गीत’ या पुस्तकाचे प्रकाशन गाणी ऐकण्याच्या छंदाला अभ्यासाचे रूप देणे आणि त्यावर पुस्तक लिहिणे हे विशेष आहे...
लेखिका स्मिता यांचे मूळ इंग्रजी पुस्तक Face IT चे बुकगंगा पब्लिकेशन्स, पुणे यांनी प्रकाशित केलेले आणि शुभदा विद्वंस यांनी भाषांतरित केलेले मराठी पुस्तक प्रकाशन सोहळा... लेखिका स्मिता यांचे मूळ इंग्रजी पुस्तक Face IT चे बुकगंगा पब्लिकेशन्स, पुणे यांच्यातर्फे मराठी भाषांतर प्रकाशित...
'बुकगंगा पब्लिकेशन्स' प्रकाशित आणि सुप्रसिद्ध लेखिका मधुवंती सप्रे लिखित 'कवितेचा मर्मबंध' या पुस्तकात बा. सी. मर्ढेकर, ग. दि. माडगूळकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, इंदिरा संत, मंगेश पाडगावकर, आरती प्रभू, मुक्ताई, बालकवी, बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांवर आस्वादक समीक्षात्मक लेखन केले आहे...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language